मएसोच्या देशपांडे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जून्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी..
माझी शाळा, माझा वर्ग, माझा बेंच

मएसोच्या देशपांडे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जून्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी..
माझी शाळा, माझा वर्ग, माझा बेंच
बारामती वार्तापत्र
बारामती येथील म.ए.सो.चे कै.ग.भि. देशपांडे माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात इयत्ता बारावी २००१-२००२ बॅचचा स्नेहमेळावा रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड मॅडम, पर्यवेक्षक श्री. शेखर जाधव सर उपस्थित होते. यावेळी फुलांच्या पायघड्या अंथरूण व पारंपारिक वाद्य वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या वर्गाला शिकविणारे माजी शिक्षक श्री. शिवराम सोनवणे सर, श्री. भगवान चव्हाण सर, श्री. भुजंग सातव सर, श्री. सदाशिव सूर्यगंध सर, श्री. शिवाजी गावडे सर उपस्थित होते.
माझी शाळा, माझा वर्ग, माझा बेंच, आमचे शिक्षक म्हणत शाळेत एक-एक वर्ग पुढे जात बारावीची परीक्षा संपली.
त्यानंतर उच्च शिक्षण घेत नोकरी-व्यवसाय, कुटुंबाचा भार स्वीकारत असताना मागे वळून पाहताना अनेक आठवणी दाटून येतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत स्नेहमेळाव्यामध्ये चिमटीतून निसटलेले आनंदचे क्षण आठवत, शालेय जीवनातील प्रसंगांना विद्यार्थिनींनी उजाळा दिल्याचे पाहून मनोमन समाधान वाटल्याचे उपस्थितांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये सौ. रोहिणी गायकवाड यांनी “मज आवडते ही मनापासून शाळा” ही कविता माजी विद्यार्थ्यांसमोर सादर करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. म. ए. सो. शाळा म्हणजे खरोखरच शाळांची शाळा म्हटले तर वावगे ठरणार नाही; कारण इथले शिक्षक शिक्षकांना प्रशिक्षण देतात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारी ही पहिली शाळा तसेच इतरांना प्रशिक्षित करणारी ही शाळा असे गौरवोद्गार माननीय मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
तसेच भावी आयुष्यासाठी सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी श्री. वल्लभ गावडे, श्री. प्रसाद कळसकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये शालेय आठवणींना उजाळा दिला.
मेळाव्याचे आयोजन सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी चव्हाण यांनी केले तर आभार श्री. नवनाथ मुळीक यांनी मानले .
यानिमित्ताने शाला समिती अध्यक्ष अजय पुरोहित, प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजीव देशपांडे, फनेंद्र गुजर, उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, पर्यवेक्षक दिलीप पाटील, जयश्री शिंदे, मएसो परिवारातील सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक , सेवक वर्ग उपस्थित होते.