बावडा येथे २० महिला लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वाटप.
महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत बेबी केअर किट व टी.एच.आर.चे वाटप.

बावडा येथे २० महिला लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वाटप.
महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत बेबी केअर किट व टी.एच.आर.चे वाटप.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
बावडा येथे २० महिला लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत बेबी केअर किट व टी.एच.आर.चे वाटप येथे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) करण्यात आले. यावेळी बावडा सरपंच किरण पाटील,उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामसेवक बी.ए. नागापुरे, बेबी ढवळकर, अंजली दिक्षित, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजनांचा फायदा महिला लाभार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन यावेळी अंकिता पाटील यांनी केले.एकात्मिक बाल विकास सेवा योजना हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेला उपक्रम असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे.
लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाळापूर्व शिक्षण सेवा आदी उपक्रमांचा यात समावेश आहे.
लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या ह्या बालकांच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही, म्हणून या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमांमध्ये देण्यात आली.