बिरदेव डोणे यांचा बारामतीमध्ये सत्कार व प्रेरक व्याख्यान
बुधवार दिनांक ७ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता

बिरदेव डोणे यांचा बारामतीमध्ये सत्कार व प्रेरक व्याख्यान
बुधवार दिनांक ७ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता
बारामती वार्तापत्र
यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यशस्वी होऊन आय पी एस पदी निवड झालेले श्री बिरदेव डोणे यांचा सत्कार समारंभ बारामती येथे बुधवार दिनांक ७ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केलेला आहे.
नटराज नाट्य कला मंडळ येथे भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार कु. रेश्मा पुणेकर यांच्या शुभहस्ते हा सत्कार समारंभ होणार असून त्याचवेळी विद्यार्थ्यांसाठी श्री डोणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शालेय, महाविद्यालयीन आणि इंजिनिअरिंग चे पदवी पर्यंतचे शिक्षण विशेष गुणवत्तेने पूर्ण केलेल्या श्री बिरदेव डोणे यांनी त्याच जिद्दीने यु पी एस सी परीक्षेत देखील प्रशंसनीय यश संपादन केलेले असून त्यांचा हा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
याच उद्देशाने त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे असे संयोजकांनी कळविले आहे.