बिलं भरणारी अॅप सुरक्षित आहेत का? ऑनलाइन पेमेंट करताना घ्या ही काळजी.
क्रेडिट कार्डनी विविध बिलं भरल्यानंतर अनेक अॅप्स आपल्याला कॅश बॅक, रिवार्ड पॉइंट्स अशा विविध ऑफर्स देत असतात.
बिलं भरणारी अॅप सुरक्षित आहेत का? ऑनलाइन पेमेंट करताना घ्या ही काळजी.
क्रेडिट कार्डनी विविध बिलं भरल्यानंतर अनेक अॅप्स आपल्याला कॅश बॅक, रिवार्ड पॉइंट्स अशा विविध ऑफर्स देत असतात.
बारामती वार्तापत्र
मात्र, या अॅपवरून ऑनलाइन व्यवहार करणं कितपत सुरक्षित आहे. आणि त्यात आपले बँकचं बचत खातं नोंदवणं योग्य आहे का? याबाबत आपण माहिती जाणून घेऊया.
CRED हे एक अॅप असून त्यावर तुम्ही जेव्हा नोंदणी करता तेव्हा तुमचे सर्व कार्ड डिटेल या ठिकाणी सेव्ह केले जातात. यात नेटबँकिंग, यूपीआय तसेच ऑटो पे या माध्यमातून यावरून बिल भरू शकता. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर (सिबिल स्कोअर) 750 पेक्षा अधिक आहेत, त्यांनाच याद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्ही हा स्कोअर मिळवला नसेल तर तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये टाकून तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर कसा वाढवावा याचे मार्गदर्शन केलं जातं.
जेव्हा तुम्ही या अॅपचा वापर क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी करता तेव्हा CRED कॉईन्स मिळतात. तुम्ही जेवढं बिल भरता त्याच्या प्रत्येक रुपयासाठी एक CRED कॉईन दिलं जातं. ही कॉईन तुम्ही विविध रिवार्ड मिळवण्यासाठी वापरू शकता. यात विविध सवलती, किंवा विविध वस्तू घेण्याचे पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही ‘किल द बिल’ या प्रकारात या ही CRED कॉइन पैशांत रुपांतरित करून घेऊ शकता. 1000 CRED कॉइनच्या बदल्यात तुम्हाला रोख 5 ते 10 रुपये मिळतात हे पैसे CRED च्या ई वॉलेटमध्ये जमा होतात. पेटीएम हे अॅप 2500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचं क्रेडिट कार्ड बिल भरण्यानंतर पेटीएम अप 1 हजार पॉइट्स देतं. पेटीएम फर्स्ट पॉइंट्स देतं. त्याचा उपयोग तुम्ही पेटीएमवर वस्तू, सेवा खरेदीसाठी करू शकता. पेटीएमवर गरज असल्यास क्रेडिट कार्डाची सर्व माहिती या ठिकाणी सेव्ह केली जाते़. ट्रॅन्झॅक्शनसाठी तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी भरावी लागते़. फोन पेवर तुम्हाला क्रेडिट कार्डची माहिती सेव्ह करण्याची गरज नसते.
CRED मध्ये तुम्ही खर्च कशा प्रकारे करता याचं विश्लेषण केलं जातं. याचबरोबर क्रेडिट कार्डावरील काही संशयास्पद व्यवहारांच्या बाबतीत ते तुम्हाला सतर्कही करतात. वाढीव शुल्काबाबत तुम्हाला माहिती दिली जाते. तुमचं बिल आल्याचा अलर्टही हे अप देतं. फोन पे आणि पेटीएम या अॅपवर क्रेडिट स्कोअरचा निकष नसल्याने याचा वापर क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी होतो़ शिवाय फोन पेवर तुमच्या कार्डाची माहिती सेव्ह केली जात नाही. आपला डेटा व त्याची सुरक्षितता यांची चिंता त्या अॅपवर असते ज्यात तुमचे कार्ड माहिती व बँक खाते सेव्ह केले जाते तुमच्या सर्व व्यवहारांचे स्टेटमेंट आणि त्यांच्या विश्लेषणासाठी तुमच्या ईमेलचा वापर करण्याची परवानगीही CRED मागते.
रूपीटिपचे संस्थापक आदर्श थम्पी म्हणाले, ‘ यातून तुमचा डेटा हॅक होऊ शकतो़ हॅकर्स आपल्या इमेलच्या इनबॉक्समध्ये प्रवेश करण्यासाठी पासवर्ड रिसेट करण्याची विनंती करू शकतात. मोबाईल नंबर बदलू शकतात. अनेक वेळा पेमेंटसाठी बँकेतून पैसे वर्ग केले जातात मात्र, ते पेमेंट झालेले नसते, अशाही अनेक तक्रारी आहेत. शिवाय ही रक्कम बँकेत परत येण्यास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे असते. छोट्या बँकेचे खाते असेल तर अशा समस्यांना तुम्हाला सामारं जावं लागू शकतं.’
जर तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी अशी अॅप वापरत असाल तर सर्वांत पहिल्यांदा त्या कंपनीच्या स्कीमबद्दल संपूर्ण माहिती करून घ्या आणि मगच ती वापरा. जर तुम्हाला त्यात काही शंका असेल तर तुम्ही पारंपरिक NEFT, नेटबँकिंग हे पर्याय वापरू शकता जे सुरक्षितही आहेत.