बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटर तर्फे बारामती नगरपालिकेचे कर्मचारी साठी शंभर पीपीटी किट सुपूर्त
सामाजिक संस्थेने सुद्धा पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटर तर्फे बारामती नगरपालिकेचे कर्मचारी साठी शंभर पीपीटी किट सुपूर्त
सामाजिक संस्थेने सुद्धा पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले
बारामती वार्तापत्र
सध्या कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या बारामती नगरपरिषदेच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. यातच कोरोनाबाधित मृतदेहांवर अंतीमसंस्कार करण्याची जबाबदारी ही या यंत्रणेवरच आहे व तेही हि जबाबदारी अत्यंत तडफेने पार पाडित आहेत. याकामी कोरोना योद्ध्यांना लागणाऱ्या संपूर्ण पी पी इ किट्सची गरज असल्याचे समजल्यानंतर व यासंदर्भात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्री किरणराज यादवसाहेब यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे त्यांनी केलेल्या सहकार्याच्या आव्हानाला लगेचच काही तासांच्या आत प्रतिसाद देऊन बारामती येथील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर बारामतीच्या वतीने एकूण शंभर पि पी इ किट त्वरित देण्यात आले. या प्रसंगी बिल्डर्स असो चे विद्यमान अध्यक्ष श्री विक्रम तांबे,संजय संघवी,आदेश वडुजकर, शामरावराऊत, चंद्रकांत शिंगाडे,सुनील देशमुख,दीपक काटे . दत्तात्रय बोराडे हे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.