बेशिस्त वाहनचालक व विना मास्क वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई…
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत दंड वसूल
बेशिस्त वाहनचालक व विना मास्क वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत दंड वसूल
सोमेश्वर नगर;बारामती वार्तापत्र
सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झाला आहे त्यामुळे सोमेश्वर नगर परिसरात वाहतूक वाढली असल्याने बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सूचनेप्रमाणे व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. आर सी पी पथक बारामती व वाहतूक पोलीस नाईक बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे, पोलीस हवालदार महेश पन्हाळे यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रिप्लेक्टर न लावल्यामुळे व मोटार वाहन कायद्याच्या अन्य कलमान्वये 31 वाहन चालकावर कारवाई करून 13 हजार 700 रुपये दंडात्मक कारवाई केलेली असून 54 वाहनचालकांवर विना मास्क कारवाई करण्यात आली असून पाच हजार चारशे रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास साठी रिफ्लेक्टर चा वापर करावा आवाहन केले आहे.