बोराटवाडी व खोरोची भागात आज ३३ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ
खोरोची येथे होणार जाहिर सभा
बोराटवाडी व खोरोची भागात आज ३३ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ
खोरोची येथे होणार जाहिर सभा
प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी व खोरोची भागात आज (दि.१५) ३३ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.तसेच सायंकाळी ६ वाजता खोरोची येथे जाहिर सभा होणार आहे.
सदरच्या निधीतून बोराटवाडी येथील नीरा नदीवरील पुल बांधणे १६ कोटी, खोरोची येथील नीरा नदीवरील पुल बांधणे १२ कोटी, खोरोची राष्ट्रीय पेयजल योजना लोकार्पण १ कोटी ५७ लाख तसेच बोराटवाडी व खोरोची येथील विविध विकास कामे होणार आहेत.
या सभेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, दीपक जाधव, बापूराव शेंडे, छायाताई पडसळकर, बाळासाहेब करगळ, राष्ट्रवादी चे सर्व आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.