ब्रेकिंग न्युज ; मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार; नवे नियम कोणते ?
राज्यात लॉकडाऊन करावाच लागेल
ब्रेकिंग न्युज ; मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार; नवे नियम कोणते ?
राज्यात लॉकडाऊन करावाच लागेल
मुंबई :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी करोना संक्रमणाचा प्रसार कमी झालेला नाही. करोना रुग्णवाढ कायम असून, मृतांची संख्या वाढत असल्यानं काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक लॉकडाउनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार काय करणार याकडे लक्ष लागलं होतं. पण, राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.
मुख्य सचिवांच्या लॉकडाऊनचे आदेश काढणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भात जनतेशी संवाद साधून त्याबद्दल भूमिका मांडतील असं मंत्रिमंडळ बैठकीनंतर ज्येष्ठ मंत्र्यांनी जाहीर केलं होतं मात्र नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी आजचा फेसबुक संवाद रद्द केल्यान संपूर्ण लॉकडाऊन संदर्भातील अध्यादेश मुख्य सचिवांच्या मार्फत जाहीर होईल अशी माहिती मिळत आहे. हा अध्यादेश राज्य सरकार कधी जाहीर करणार; तसेच यामध्ये नवे नियम काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात लॉकडाऊन करावाच लागेल
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. तसेच रोज मृतांचा आकडासुद्धा वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्थासुद्धा तोकडी पडत आहेत. याच कारणामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्य मंत्रिमंडळाने काल (20 एप्रिल) व्यक्त केले होते. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याचे ठरले असून तो निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेसुद्धा त्यांनी सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द
राज्यात लॉकडाऊन लागू करणार हे ठरलेले आहे. मात्र, याविषयीचा अधिकृत निर्णय हे मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाकरे हा निर्णय आज (21 एप्रिल) फेसबुक तसेच इतर माध्यमांतून जनतेशी लाईव्ह संवाद साधून जाहीर करतील असेसुद्धा सांगण्यात येत होते. मात्र, नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपला ऑनालाईन संवाद रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ऐवजी आता लॉकाडाऊनचा निर्णय हा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांच्या मार्फत जाहीर केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.