बीड

ब्रेकिंग न्यूज;सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड!;22 दिवसांनी अखेर वाल्मिक कराड सरेंडर, पुण्यात शरणागती

तत्पूर्वी Video जारी करत म्हणाला... तर शिक्षा भोगायला तयार

ब्रेकिंग न्यूज;सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड!;22 दिवसांनी अखेर वाल्मिक कराड सरेंडर, पुण्यात शरणागती

तत्पूर्वी Video जारी करत म्हणाला… तर शिक्षा भोगायला तयार

बारामती वार्तापत्र 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा संशयित आरोपी वाल्मिक कराड याने अखेर शरणागती पत्करली. नाट्यमय घडामोडीर घडल्यानंतर आज वाल्मिक कराडने पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केले.

सरेंडर होण्याच्या आधी वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर आला होता.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज शरणागती पत्करली.

संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.

देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीची 9 पथके

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. तर, संपत्ती जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली.

खुलेआम फिरत होता कराड…

वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID जंगजंग पछाडत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलाही वाल्मिक कराडने काहीजणांना भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.

>> वाल्मिक कराडने कधी, कुठं केला प्रवास?

> वाल्मिक कराड हा 9 डिसेंबर रोजी परळीमधून बाहेर पडला.

> 10 आणि 11 डिसेंबर रोजी तो उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होता. 11 तारखेला त्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

> 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने दिवगंत भाजप नेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचे लोकेशन परळी दाखवण्यात आले.

> 13 डिसेंबर रोजी त्याचे लोकेशन समजून आले नाही.

> 14 डिसेंबरला वाल्मिक कराडने दत्त जयंती निमित्त पोस्ट टाकली

> 15 डिसेंबर रोजी त्याने धनंजय मुंढे आणि पंकजाताई मुंढे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट केली.

> 16 तारखेला वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य होता. त्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!