ब्रेकिंग न्यूज; प्रतीक्षा संपली; दहावीचा ऑनलाइन निकालाची तारीख जाहीर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

प्रतीक्षा संपली; दहावीचा ऑनलाइन निकालाची तारीख जाहीर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
मुंबई, प्रतिनिधी
उद्या दि. 17 जून, 2022 रोजी दु. 1 वा.ऑनलाईन जाहीर होईल असं ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
यंदाच्या परीक्षेची वैशिष्ट्ये
७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे जादा वेळ
४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे जादा वेळ
परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन,
परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणावाबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती
परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी
एकूण परीक्षा केंद्रे – २१ हजार ३८४
मुख्य केंद्रे : ५ हजार ५०
उपकेंद्रे : १६ हजार ३३४
परीक्षा अर्ज भरलेले विद्यार्थी : १६ लाख ३८ हजार १७२
विद्यार्थी : ८ लाख ८९ हजार ५८४
विद्यार्थिनी : ७ लाख ४९ हजार ४७८