भरसभेत नागरिकाची तक्रार ‘अजित पवार आडवे आले तरी उचला’ कार्यकर्त्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांची पोलीस उपअधीक्षकांना निर्देश
पवारांच्या सूचनेनंतर तक्रारदाराची गाळण

भरसभेत नागरिकाची तक्रार ‘अजित पवार आडवे आले तरी उचला’ कार्यकर्त्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांची पोलीस उपअधीक्षकांना निर्देश
पवारांच्या सूचनेनंतर तक्रारदाराची गाळण
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले. त्यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. एका नागरिकाने जागेची मोजणी असलेल्या वादाची तक्रार मांडली. ‘दोन गटांत वाद असल्याने समोरची व्यक्ती ऐकत नाही, असे सांगितल्यावर अजित पवार संतापले. त्यांनी त्याच क्षणी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पोलिस उपअधीक्षकांना निर्देश देऊन ‘एकत्र बैठक घेऊन मेळ बसवा, नाही तर या प्रकरणात अजित पवार आडवे आले, तरी त्यांना उचला’ असे स्पष्ट केले. यामुळे तक्रारदाराचीच गाळण उडाली.
पवार यांच्या काटेवाडी गावात ‘एक तास राष्ट्रवादी’साठी या उपक्रमांतर्गत आयोजित सभेत नागरिकांनी तक्रारींचा पाढाच पवार यांच्यापुढे वाचला. त्यावर पवार यांनीही आपल्या स्टाइलने फटकेबाजी करून अनेक तक्रारी निकाली काढल्या शनिवारच्या दौऱ्यात पवारांनी बारामती शहरासह सुरू तालुक्यातील विविध विकासकामांचीही पाहणी केली. बन्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पोलिस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम, कन्हा नदीवरील गवियन वॉल आदी विकासकामांची अधिकाऱ्यांसह पाहणी करून सूचना दिल्या.