भल्या पहाटे अवैध धंद्यावर डीवायएसपी यांची कार्यवाही
अमराई, बांदलवाडी पहाटेच्या सुमारास कार्यवाहीने अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
भल्या पहाटे अवैध धंद्यावर डीवायएसपी यांची कार्यवाही
अमराई, बांदलवाडी पहाटेच्या सुमारास कार्यवाहीने अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील अवैध धंद्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरू असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून
सकाळी ५.३० वाजताचे सुमारास DySP व त्यांचे पथक अवैध दारुधंदेवाईक यांचा शोध घेत असताना बारामती शहर व परिसर पिंजुन काढला असता दोन ठिकाणी अवैध गावठी हातभट्टया व त्याकरीता लागणारे रसायन मिळून आल्याने कारवाई करण्यात आली. असून एक आरोपी अटक असून एक आरोपी फरार झाला आहे.
हनुमंत बबन लाड (वय ४३) रा. बांदलवाडी ता.बारामती व मंगेश बबन लोंढे रा.सुहासनगर आमराई ता.बारामती याचेवर गुन्हा दाखल केला आहे.
बारामती, इंदापुर तालुक्यातील सर्वच अवैध दारूधंदे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधितांवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध गावठी हातभट्टयांचे घरातील घरातील हातभट्टी चालविण्यास मदत करणारे कुटूंबियांतील सदस्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
अवैध दारुधंदेवाईक यांना दारू पुरविणारे वाईन शॉपी/बारमालक यांचेवरही कारवाई करण्यात येणार आहे.