भवानीनगर येथे लाकडी – निंबोडी उपसा जलसिंचन योजनेस निधी दिल्याने फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव
उर्वरित बावीस गावांचा प्रश्न ही त्यांनी या प्रसंगी मार्गी लावला म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे

भवानीनगर येथे लाकडी – निंबोडी उपसा जलसिंचन योजनेस निधी दिल्याने फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव
उर्वरित बावीस गावांचा प्रश्न ही त्यांनी या प्रसंगी मार्गी लावला म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे
बारामती वार्तापत्र
भवानीनगर येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी काल लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन हा गेली 25 वर्ष झालं रखडलेला होता तो त्यांनी 1200 कोटी या प्रकल्पाला मंजुरीची घोषणा केली.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांनी सतत पाठपुरावा केला त्याबद्दल निंबोडी लाकडी निरगुडे म्हसोबावाडी शेटफळगडे या परिसरातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला या प्रसंगी इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री अमोल भोईटे , हनुमान निंबोडी सोसायटीचे माजी अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, निंबोडी चे माजी ग्रामपंचायत सदस्य भानुदास भोईटे , निंबोडीचे माजी उपसरपंच हिराचंद घोळवे, डॉ हरिभाऊ घोळवे, रामहरी घोळवे ,जय भगवान महासंघाचे इंदापूर अध्यक्ष दिपक खाडे , लाकडी चे माजी सरपंच संजय ढोले, राष्ट्रवादीचे विलासराव ढोले ,निरगुडेचे निलेश सोनवणे , सतीशराव गाढवे ,अण्णा कांबळे ,महेश पवार , प्रवीण घोरपडे, महेश भोईटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अमोल भोईटे म्हणाले, गेली पंचवीस वर्ष झाले इंदापूर तालुक्यातील हा लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन प्रकल्पावर वीस वर्ष विरोधकांनी राजकारण केले. राजकीय पोळी भाजण्याचे काम केले यावर राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी लाकडी -निंबोडी उपसा जलसिंचन प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला व मागील महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी हा प्रकल्प आम्ही मंजूर करणार असे इंदापूर येथे झालेल्या सभेत आश्वासन दिले होते ते आश्वासन पाळून काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 1200 कोटी रुपयांचा निधी हा अजित दादा यांनी या प्रकल्प मंजूर करून याची घोषणा केली.
उर्वरित बावीस गावांचा प्रश्न ही त्यांनी या प्रसंगी मार्गी लावला म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे एक राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय दादा व इंदापूर तालुक्याचे विकासरत्न मंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक असे आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद देतो या परिसरातील कायमचा पाण्याचा प्रश्न आदरणीय भरणे मामा यांनी सोडविला असे यावेळी त्यांनी सांगितले.