भाजपचे नेते, पॅनेल प्रमुख दिलीप खैरे यांचाच अर्ज बाद,,भाजप पुढे अडचणी वाढणार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांकरता तब्बल 632 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

भाजपचे नेते, पॅनेल प्रमुख दिलीप खैरे यांचाच अर्ज बाद,,भाजप पुढे अडचणी वाढणार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांकरता तब्बल 632 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज अर्ज छाननी मध्ये 632 अर्जांपैकी तब्बल 94 अर्ज बाद झाले आहेत. सर्वाधिक अर्ज बाद होण्याचा विक्रमही या कारखान्याच्या निवडणुकीत नोंदवला गेला आहे. दरम्यान भाजपच्या पॅनलचे सूत्रधार पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. हा भाजपच्या पॅनलला मोठा धक्का मानला जात आहे. खैरे यांच्या प्रमाणेच निरेचे सरपंच राजेश काकडे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे मेहुणे दिलीप यादव यांच्यासह काही दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांकरता तब्बल 632 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये एकट्या 22 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक 381 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 94 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून 538 अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये सर्वाधिक अवैध अर्ज होळ मोरगाव गटात झाले असून या गटामध्ये अठरा जणांचे अर्ज अवैध झाले आहेत.
सर्वाधिक उमेदवारी अर्ज निंबूत खंडाळा गटांमध्ये आले असून 105 अर्जांपैकी 91 अर्ज या ठिकाणी वैध ठरले आहेत. तर त्या खालोखाल मुरूम वाल्हा या दुसऱ्या गटाच्या मतदार संघात 93 यापैकी फक्त चार अर्ज अवैध ठरले असून 89 अर्ज वैध ठरले आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज संध्याकाळी छाननी चा गोषवारा प्रसिद्ध केला.