भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि कुटुंबीयांवर आरोप
चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केलेत, असा आरोप सोमय्यांनी केला
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि कुटुंबीयांवर आरोप
चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केलेत, असा आरोप सोमय्यांनी केला
प्रतिनिधी
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि कुटुंबीयांवर आरोप केले आहोत. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांकडून पैसे आले ते परत दिले गेले नाहीत. ठाकरे पवारांचं हेच वैशिष्ठ्य आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊतांच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले ते परत दिलेच नाहीत. ईडीची नोटीस आल्यावर संजय राऊतांनी पैसे परत दिले. अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले ते पैसे अजित पवारांनी जावायाच्या, बायकोच्या खात्यात बहिणीच्या खात्यात आणि आईच्या खात्यात वर्ग केले. अजित पवारांनी चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केलेत, असा आरोप सोमय्यांनी केला.
ईडीच्या 19 दिवस धाडी
इन्कम टॅक्सनंतर ईडीच्या धाडी पडल्या. 19 दिवस या धाडी सुरु आहेत. एक हजार कोटीपेक्षा अधिक संपत्ती समोर आली आहे. शेल कंपन्यांमधून पैसे आले आहेत. शरद पवारांना असं वाटत का पाच पंधरा लेअर तयार केल्यामुळं ब्लॅक मनी समोर येणार आला नाही. इन्कम टॅक्स आणि ईडीच्या धाडी बाहेर पडू नये म्हणून नवाब मलिकांना पुढं करण्यात आलं आहे.