भाजपाला इंदापूरात सुरुंग ; अनेक बडे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या गळाला
लाखेवाडीत ३ तारखेला हातात बांधणार घड्याळ
भाजपाला इंदापूरात सुरुंग ; अनेक बडे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या गळाला
लाखेवाडीत ३ तारखेला हातात बांधणार घड्याळ
इंदापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक व भारतीय जनता पक्षातील प्रमुख दिगज्ज नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गळाला लागले आहेत.इंदापूर तालुक्यातील मौजे लाखेवाडी येथे रविवारी (दि.३) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात ते हाती घड्याळ बांधणार आहेत.
हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, पंचायत समितीच्या विद्यमान सभापती स्वाती शेंडे, बापूसाहेब शेंडे तसेच माजी सभापती प्रशांत पाटील यांचे बंधू ॲड.बाळासाहेब पाटील यांचा पक्ष प्रवेश निश्चित होता. परंतु नियोजित कार्यक्रमाची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाचं हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत जवळचे समझले जाणारे युवा नेते दिपक जाधव यांना फोडून राज्यमंत्री भरणे यांनी अजून एक मोठा धक्का दिला आहे.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत होणारे इनकमिंग आणि भाजपा मधून होणारे आउटगोइंग हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.त्यामुळे अत्यंत वेगवान घडामोडी घडत असताना संयम बाळगून असलेले हर्षवर्धन पाटील येणाऱ्या काळात विरोधकांना कसे प्रतिउत्तर देणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.