इंदापूर

भाजप वासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न?इकडे तिकडे गेले आहेत ते परत येतील…सुशीलकुमार शिंदे

एक आमचा जुना मित्र ज्याच्यावर माझा आजही विश्वास आहे,

भाजप वासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न?इकडे तिकडे गेले आहेत ते परत येतील…सुशीलकुमार शिंदे

एक आमचा जुना मित्र ज्याच्यावर माझा आजही विश्वास आहे,

निलेश भोंग  प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांनी त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व पदे भोगली असून आता राज्यसभेवरती महाजन साहेबांची निवड होणे गरजेचे आहे,आता शिंदे साहेब हे काम तुमच्याकडे आहे. असे म्हणतं भारतीय जनता पार्टीचे जेष्ट नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसचे जेष्ट प्रवक्ते डाॅ.रत्नाकर महाजन यांची शिफारस केलीय.

मंगळवार दि. 29 जून रोजी इंदापूर मध्ये डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तर प्रमुख पाहुने म्हणून भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. राज्यसभेवरती डाॅ.रत्नाकर महाजन साहेबांची निवड होणे गरजेचे आहे असं म्हणतं काँग्रेसपासून दूर गेलेले आणि भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेसशी जवळीच साधण्याचा प्रयत्न केलाय.

उपस्थितांना संबोधित करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले,की डॉ.रत्नाकर महाजन यांनी त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व पदे भोगली असून आता राज्यसभेवरती महाजन साहेबांची निवड होणे गरजेचे आहे,आता शिंदे साहेब हे काम तुमच्याकडे आहे.मला खात्री आहे की शिंदे साहेब तुम्ही एकदा ठरवले तर दिल्लीला जायची गरज नाही, सोलापूर मधून एक फोन जरी केला तरी इंदापूर तालुक्याला राज्यसभा सुध्दा मिळू शकते. तुम्ही तो प्रयत्न करावा अशी इंदापूर तालुक्याची आणि जनतेची मागणी आहे.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले,की आजच्या या घडीला वैचारिक भुमिका घेणे हे सुध्दा महत्वाचे आहे.डाॅ.महाजन सुरवातीपासून राष्ट्रसंघात होते,युवक क्रांती दलामध्ये होते पणं त्यांना जिथं पटलं नाही तिथे ते स्थिरावले नाहीत.मला हर्षवर्धन म्हणाले की आणिबाणीचा उल्लेख करु नका म्हणून पणं काय बिघडलं त्याच्यामध्ये? आणिबाणीचं पटल नाही पणं दिल्लीला जावून महात्मा गांधींच्या समाधीपुढे त्यांनी प्रार्थना केली आणि आपले विचार मांडले पण पुढे त्याच काँग्रेस बरोबर गेले.कारण काँग्रेस मधील परिवर्तनाचे पानं आहे ते सतत खळखळत्या पाण्यासारखे आहे.

इकडे तिकडे गेले आहेत ते परत येतील…

एक आमचा जुना मित्र ज्याच्यावर माझा आजही विश्वास आहे,हा विचारवंत तुम्हाला आणखी एक नवी प्रेरणा देईल.त्याच्यातून बाहेर काढेल,जे काही आमचं नुकसान झाले आहे जे काही आमचे सहकारी इकडे तिकडे गेले आहेत ते परत येतील ! तुमच्यासारखा एक विचारवंत आणीबानी मध्ये विरोध करतो पणं काँग्रेसने निट काम केल्यानंतर तो परत काँग्रेसमध्ये येतो ही खरी त्यांची नीतिमत्ता आहे.असं म्हणत काँग्रेसचे जेष्ट नेते सुशिलकुमार शिंदे यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

लाईट गेली अनं हशा पिकला…

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे भाषण चालू असताचं अचानक लाईट गेली आणि पाटील म्हणाले की महाविकास आघाडी असल्याने लाईट का जातेय हे मला पणं कळत नाही आणि एकच हशा पिकला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!