भारताचे महान माजी धावपटू ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचं कोरोनाने निधन
प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा शुक्रवारी (18 जून) कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यांना 24 मे 2021 रोजी कोरोना उपचारासाठी मोहालीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट
प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा शुक्रवारी (18 जून) कोरोनामुळे मृत्यू झालाय. विशेष म्हणजे मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांचा 5 दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मिल्खा सिंग यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांनी दोघांच्याही एकापाठोपाठ मृत्यूबद्दल बोलताना त्यांच्यातील प्रेमपूर्ण संबंधांच्याही आठवणींना उजाळा दिलाय
मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाने सांगितलं, “मिल्खा सिंग यांचा 18 जून 2021 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी मृत्यू झाल्याचं सांगताना आम्हाला अतीव दुःख होत आहे. त्यांनी कोरोनाला कडवी झुंज दिली. निर्मलाजी यांच्या मृत्यूनंतर मिल्खाजींचा अवघ्या 5 दिवसांनी मृत्यू होणं हे त्या दोघांमधील खरं प्रेम दर्शवतं.”