भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार : अतुल लोंढे
किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे.

नागपूर,प्रतिनिधी
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या आमदार आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. पण ‘सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ) यांनी दिली.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्यांविरोधात दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली
पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून 1 रुपयाचा दावा दाखल करणार आहे.