भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा महाराष्ट्र सचिवपदी संतोष कांबळे यांची निवड
प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी दिले नियुक्ती पत्र
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा महाराष्ट्र सचिवपदी संतोष कांबळे यांची निवड
प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी दिले नियुक्ती पत्र
इंदापूर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.आमदार सुधाकर भालेराव यांनी कांबळे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या निकषांवर ही निवड केली गेली आहे.
या पदाच्या माध्यमातून समाजातील पीडित, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा.संघटन कौशल्याने राज्यभर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाज बांधवांना भाजपकडे जोडण्यासाठी अथक परिश्रम कराल,कामाचा अनुभव पक्ष संघटनेस निश्चितपणे होईल अशी अपेक्षा निवडपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले संतोष कांबळे यांच्या निवडीमुळे भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांसह संबंधितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.