भारतीय युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी आकाश साळवे यांची निवड.
बामसेफचे राष्ट्रीय महासचिव कुमार काळे यांनी दिले नियुक्ती पत्र.
भारतीय युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी आकाश साळवे यांची निवड.
बामसेफचे राष्ट्रीय महासचिव कुमार काळे यांनी दिले नियुक्ती पत्र.
इंदापूर:प्रतिनिधी
शुक्रवार (दि.24 जुलै) रोजी भारतीय युवा मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्ष पदी आकाश साळवे यांची निवड करण्यात आली. साळवे यांनी गेली पाच वर्षे अत्यंत परिश्रम घेऊन संघटना वाढीचे काम केले असून त्यांचे तालुक्यातील अनेक तरुण वर्गात तसेच समाजात चांगले नाव असल्या कारणाने त्यांचा गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा व अनुभव बघता संघटना वाढीसाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते विनोद कांबळे यांची भारतीय युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी बामसेफचे राष्ट्रीय महासचिव कुमार काळे, बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टी युवा चे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब जाधव, बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ बारवकर भारत मुक्ती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण व भारतीय युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुरज धाईंजे हे उपस्थित होते.