इंदापूर

भिगवण पोलीसांकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई

बोट मालकांसह बोटीवर काम करणार्‍या परप्रांतीय युवकांच्या वर गुन्हा दाखल

भिगवण पोलीसांकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई

बोट मालकांसह बोटीवर काम करणार्‍या परप्रांतीय युवकांच्या वर गुन्हा दाखल

इंदापूर:-बारामती वार्तापत्र
उजनी जलाशयात अवैद्य वाळू उपसा करणार्‍या बोटींवर इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी हद्दीत भिगवण पोलिसांनी कारवाई करत तीन बोटी जिलेटिन च्या साह्याने उध्वस्त केल्या आहेत. या बाबत इन्कलाब रशिद पठाण वय -38 , धंदा- नोकरी नेमणुक भिगवण पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हंटले आहे की यातील आरोपी यांनी शासनाचा कोणतीही रॉयल्टी अथवा परवाना नसताना बेकायदा बिगर परवाना उजनी जलाशयातील उथळ पाणी असलेल्या मध्यभागी जमिनीत दोन मोठी (वाळु वाहतुकी करीता वापरण्यात येणारी लोखंडी यांत्रिक त्याचे आतील बाजुस तीन कप्पे असलेली) बोट व एक लहान सेक्शन बोटीचा वापर करुन नदीच्या किना-यावर वाळु काढुन वाळु चोरी केली आहे.

YouTube player

यात 1200000 / – दोन मोठी वाळु वाहतुकी करीता वापरण्यात येणारी लोखंडी यांत्रिक बोट व एक लहान सेक्शन 40,000 /- रुपये आणि दोन बोटी मध्ये असणारी अंदाजे 8 ब्रास वाळु असा अंदाजे किंमत 1240000 /-रुपये किमतीचा आहे.

तसेच बोट मालकांसह बोटीवर काम करणाऱ्या परप्रांतीय युवकांवर गु.र.नं 371/2020 भा.द.वि.कलम- 439 , 379 , 34 पर्यावरण संरक्षण अधि 1986 चे कलम 15 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 ) शौकत कमरुद्दीन शेख वय 32 वर्षे रा.मनसिंहा थाना राजमहल जिल्हा.साहबगंज राज्य झारखंड 2 ) बाहुद्दीन मुजामिल शेख वय 20 वर्षे रा.बेगमगंज थाना नादानगर जि.साहबगंज ,राज्य झारखंड 3 ) रफिक दानेश शेख वय 32 वर्षे रा.बेगमगंज थाना नादानगर जि.साहबगंज राज्य, झारखंड 4 ) हन्नन बजरुद्दीन शेख वय 34 वर्षे रा.तिनहारिया कलबन्ना थाना नादानगर जि.साहबगंज राज्य झारखंड 5 ) मनीरुल कमरुद्दीन शेख वय 35 वर्षे रा.मनसिंहा थाना राजमहल जिल्हा साहबगंज राज्य झारखंड 6 ) रोहित मज्जामिल शेख वय 27 वर्षे रा.दरगाडांगा थाना नादानगर जि साहबगंज राज्य झारखंड ) आकाश सुरेश सावंत वय 19 वर्षे रा.बाभळगांव धुमाला ता.कर्जत जि.अहमदनगर 8 ) मुबारक मिरज शेख वय 26 वर्षे रा.पहाडगाव थाना नादानगर जि साहबगंज राज्य झारखंड 9 ) सोन्या बाळासाहेब सरक वय 25 वर्षे रा.कात्रज ता.करमाळा जि सोलापूर ( बोटमालक ) 10 ) ज्ञानेश्वर शिवाजी सोळंके ( बोटमालक ) रा.वीरवाडी मदनवाडी ता.इंदापूर जि.पुणे पैकी आठ जणांना अटक करण्यात आली असून सदरचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार वीर हे करित आहेत.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असतानाच भिगवण पोलिसांनी धाडसी कारवाई करत उजनी धरणाच्या पाटलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळू उपसा करण्यावर कारवाई केल्याने वाळू उपसा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

परंतु उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळूची तस्करी महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ टाकत निर्धास्तपणे चालू असून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींचे मालक,बोटीचे चालक व वाळू उपसा करणाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे व त्यांची कोण पाठराखण करत आहेत त्यांचा छडा पोलिसांनी लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असा सुर नागरिकांमधून निघत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!