शेतात काम करणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने लुटणाऱ्या आरोपींना अटक…
धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरी

शेतात काम करणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने लुटणाऱ्या आरोपींना अटक…
धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरी
क्राईम; बारामती वार्तापत्र
दि.31/7/2021 रोजी सायं. 5:30 वा. च्या सुमारास मौजे उंडवडी सुपे ता.बारामती येथे बारामती ते पाटस रोड लगत असणाऱ्या शेतात खुरपणी करत असताना सौ. लक्ष्मी गवळी वय – 55 वर्षे या महिलेला मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात इसमांनी विळयाचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 4.75 ग्रॅम वजनाचे 22510/- रुपये किंमतीचे मंगळसूत्र जबरीने चोरी करून नेले होते. त्यावरुन अज्ञात इसमांविरोधात गु. र. नं. 281/2021 भादवि 392,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने बारामती- पाटस रोड वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासून फोटो तसेच रेखाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केले होते. त्यावरून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा 1)सौरभ तात्याबा सोनवलकर वय 20 वर्ष रा. सस्तेवाडी ता.बारामती 2) सागर दत्तात्रय जगताप वय 21 रा.वानेवाडी ता. बारामती जि. पुणे 3) अल्पवयीन मुलगा रा.सस्तेवाडी यांनी केल्याची माहिती मिळाली होती. सदरचे आरोपी हे वाणेवाडी- होळ रोडने येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडुन त्यांचेकडे चौकशी केल्यावर त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील वापरलेली पल्सर मोटारसायकल ही जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. डॉ. अभिनव देशमुख सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , मा.श्री मिलिंद मोहिते सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे, पोसई सलीम शेख, पोहवा महेंद्र फणसे, पोना सागर चौधरी, पोना मणेरी, पो.शि. ज्ञानेश्वर सानप पो.शि अक्षय सिताप, पो शि सलमान खान ,पो.शि पोपट नाळे, पो.शि अमोल भुजबळ, पो शि भाऊसाहेब मारकड, पो.शि सचिन दरेकर , पो.शि भागवत पाटील यांनी केली आहे .