भिडेवाडा पुणे येथील जागा भुसंपादित करून राष्ट्रीय स्मारक घोषित करा;आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीची मागणी.
इंदापूरच्या नायब तहसीलदार यांना दिले निवेदन.
भिडेवाडा पुणे येथील जागा भुसंपादित करून राष्ट्रीय स्मारक घोषित करा;आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीची मागणी.
इंदापूरच्या नायब तहसीलदार यांना दिले निवेदन.
इंदापूर:-प्रतिनिधी
देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाडा ही वास्तू प्रसिद्ध आहे. महात्मा जोतीराव फुलेंनी १ जानेवारी १८४८ साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडीअडचणींचा सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाची दारे खुले करून दिले. त्या भिडेवाड्याची आज अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. या ठिकाणची दुरावस्था होणे तमाम फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे,तसेच भिडेवाडा पुणे येथे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती.
त्याबाबत उच्च न्यायालय, खंडपिठ मुंबई येथे जे प्रकरण चालू आहे त्यामध्ये शासनाने स्वताःहुन हजर व्हावे व ते प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर योग्य ते प्रयत्न करावेत व ती जागा शासनाने भुसंपादीत करून फुले प्रेमी जनतेला न्याय द्यावा, भिडेवाडा, पुणे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करून तात्काळ विकसित करावी ही मागणी शासनाकडे वेळोवेळी करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून शासनाने पहिली मुलींची शाळा भिडेवाडा, पुणे ही जागा शासनाने भुसंपादीत करून राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरच घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर जन आंदोलन करण्यात येईल याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. अशा आशयाचे निवेदन इंदापूर च्या नायब तहसीलदार यांच्याकडे आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी तानाजी भोंग,सुनिल मोहिते,बिभीषण लोखंडे,सुनील बोराटे,संतोष शेंडे,बापू भोंग हे उपस्थित होते.