भिमाई आश्रमशाळेत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
संस्थेतील कर्मचारी होते उपस्थित
इंदापूर : प्रतिनिधी
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि मुलांचे , मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा झाला. संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी सामूहिक पंचशील, त्रिशरण व बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी ॲड. समीर मखरे म्हणाले की, दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला जिल्हा नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती, त्या घोषणे प्रमाणे दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आपल्या लाखो अनुयायांना धार्मिक गुलामीतून मुक्त केले. दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी जगातील सर्वात मोठा धर्मांतर सोहळा नागपूर येथे पार पडला. असे यावेळी ॲड.समीर मखरे यांनी नमूद केले.
यावेळी संस्थेतील सर्व विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा मखरेंनी दिल्या.
यावेळी संस्थेचे संचालक गोरख तिकोटे तसेच संतोष शेंडे तसेच संस्थेतील विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते . कोविड- १९ चा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन कार्यक्रमावेळी करण्यात आले.