भिमाई आश्रमशाळेला संस्थाचालक संघटनेच्या राज्याध्यक्षांनी दिली सदिच्छा भेट
संस्थेच्या वतीने राज्यध्यक्षांचा करण्यात आला यथोचित सन्मान
भिमाई आश्रमशाळेला संस्थाचालक संघटनेच्या राज्याध्यक्षांनी दिली सदिच्छा भेट
संस्थेच्या वतीने राज्यध्यक्षांचा करण्यात आला यथोचित सन्मान
इंदापूर :- बारामती वार्तापत्र
( ४ डिसेंबर २०२०) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या संस्थेला महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण यांनी धावती सदिच्छा भेट दिली.सोबत संघटनेचे राज्य सल्लागार मानवेंद्र केंद्रे हे ही होते.
राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण व राज्य सल्लागार मानवेंद्र केंद्रे ह्या दोहोंचाही शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन संस्थाप्रमुख तथा इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी संस्थेच्या कार्यालयात कर्मचार्यांच्या समवेत छोटे खानी यथोचित सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना शेषराव चव्हाण म्हणाले की मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या संस्थेच्या सर्व विभागांना सदिच्छा भेट दिली, सदिच्छा भेट देत असताना संस्थेची सुसज्ज इमारत, तेथील प्रसन्न आणि अल्हाददायक वातावरण असलेला निसर्गरम्य परिसर, अद्ययावत सुखसोयीं उपलब्ध असलेली संस्था/ शिक्षण संकुल पाहून तसेच संस्थाप्रमुख मखरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमवेत माझा येथोचीत सन्मान केला, त्याबद्दल मला खूप मनापासून आनंद झाला आहे त्याबद्दल मखरे परिवाराचा मनापासून आभारी आहे. अशा भावना चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
चव्हाण पुढे म्हणाले की, माझी लातूर येथील संस्थाचालकांच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड झाली. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, परिपोषण अनुदानासाठी, आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांनासाठी सर्व संस्थाचालकांना बरोबर घेऊन भविष्यात काम करणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो, याच धर्तीवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने आश्रमशाळा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा.तो मिळावा यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली .शिव,फुले, शाहू आणि डॉ.आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांचे काम फार मोठे आहे,त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सत्ताधाऱ्यांच्या,प्रशासनाच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधात फार मोठा संघर्ष उभा करून आपल्या संस्थेला वैभव मिळवलं आहे. हे प्रत्यक्ष पाहून मला मनस्वी आनंद झाला आहे. यासंदर्भात ताजं उदाहरण द्यायचं झालं तर तब्बल ८२ दिवस बेमुदत धरणे आंदोलन करून प्रलंबित अनुदानासाठीचा अथक संघर्ष मी वृत्तपत्रांमध्ये वाचला असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
रत्नाकर मखरे म्हणाले की, चव्हाण व केंद्रे आपण माझ्या संस्थेला धावती भेट दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच मुळात संघर्षातूनच केली आहे . शिव, फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार आणि आदर्श घेऊनच मी माझ्या संस्थेचा कारभार पाहत आहे. माझ्या संस्थेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना बहुजन महापुरुषांच्या विचार आणि आचाराचे धडे देण्याचे काम माझा शिक्षक वर्ग निरंतर करत आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्रात असलं तरी आपल्याला VJNT आणि बहुजनांच्या प्रश्नांसाठी, न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावे लागतात. त्याशिवाय आपल्या पुढे काही पर्याय नसतो, त्यामुळे मी आणि माझा कर्मचारी संघर्षापासून कधीच मागे हटला नाही. आणि भविष्यात हटणार नाही. असे शेवटी मखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे.यावेळी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.