भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशन येथे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन
भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशन येथे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे दरवर्षी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यंदा कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर घरातूनच अभिवादन करून साजरा करुया, असे आवाहन प्रशासनाने केले असून परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सुचनांही दिल्या आहेत.
या अनुषंगाने आज दि.२३ डिसेंबर रोजी इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्व समाज बांधवांनी यावर्षी कोविड -१९ महामारीच्या अनुषंगाने अभिवादन कार्यक्रम हा स्वतःच्या घरी राहूनच साजरा करावा असे आवाहन केले.
यावेळी रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे,रिपाइंचे इंदापूर तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,रिपाइंचे बारामती लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनावणे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, माऊली नाचणं,प्रकाश पवार,अमोल मिसाळ, नितीन आरडे,नितीन घाडगे, इ.उपस्थित होते.