क्राईम रिपोर्ट

भोंदू मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात ; पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यातून केली अटक

पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली.

भोंदू मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात ; पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यातून केली अटक

पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली.

 क्राईम;बारामती वार्तापत्र

कॅन्सर रुग्णास बरे करण्याची भूलथाप मारुन, बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा.उंदरगांव ,ता. करमाळा ,जि सोलापुर) याला सातारा जिल्ह्यातील फलटण-सातारा मार्गावरील सालपे या ठिकाणाहून बारामती तालुका ‌पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

सालपे गावच्या परिसरात असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये मनोहर मामा भोसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (दि १०) दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. हे फार्म हाऊस कोणाच्या मालकीचे आहे, याची माहिती पोलिस घेत आहेत.

शशिकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती ता बारामती जि. पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले या भोंदुबाबाच्या सावंतवाडी, गोजूबावी (ता. बारामती जि. पुणे) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला.

तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २ लाख ५१ हजार ५०० रुपये त्यांचे व त्यांच्या वडीलांच्या जिवाचे बरे वाईट होईल, अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे.

पैसे परत मागितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. मनोहर मामा भोसले याचे इतर साथीदारांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे.

याबाबत खरात यांच्या तक्ररीवरून आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगांव ता. करमाळा जि.सोलापुर), विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओंकार शिंदे यांच्याविरूध्द भा.द.वि. कलम, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (आक्षेपार्ह जाहीरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!