स्थानिक

मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी;बारामतीच्या कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड निलंबित

पंधरा दिवसातील दुसरी कारवाई

मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी;बारामतीच्या कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड निलंबित

पंधरा दिवसातील दुसरी कारवाई

बारामती वार्तापत्र

बारामती पंचायत समिती मधील कनिष्ठ
अभियंता अक्षय झारगड यांचे निलंबित करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

जिल्हा परिषदेने जनसुविधाअंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसातील दुसरी कारवाई आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई करून आणखी एक दणका दिला आहे. बांधकाम विभागामध्ये अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या चौकशी सुरू आहेत मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या प्रलंबित ठेवून एक प्रकारे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

प्राधिकृत अधिकार्‍याची परवानगी न घेता परस्पर हा बदल करून काम केले गेले. झारगड यांच्याबद्दल अनेक गंभीर तक्रारी आहेत. याप्रकरणी गावकर्‍यांची तक्रार, त्याचबरोबर बारामती पंचायत समितीचे उपअभियंता यांचा अहवाल आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडून झालेली चौकशी या सर्व बाबी विचारात घेऊन झारगड यांचे निलंबन करण्यात आले.

बांधकाम विभाग त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागामधून देखील चौकशीची प्रकरणे वेळेत निर्गत होत नसल्याबद्दलच्या देखील तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे होत्या. मात्र गजानन पाटील यांनी या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले, त्यानंतर या कारवाया सुरू झाल्या आहेत.

झारगड हे बारामती पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वाघळवाडी येथे जनसुविधा अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते, ते काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तसेच संपूर्ण कार्यवाही ही कनिष्ठ अभियंता म्हणून झारगड यांच्याकडे होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!