शैक्षणिक

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसागरचे दोन विद्यार्थी राज्यात चमकले

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसागरचे दोन विद्यार्थी राज्यात चमकले

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मधील इयत्ता १ ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी २ फेब्रुवारी मध्ये झालेल्या मंथन (प्रज्ञाशोध ) राज्यस्तरीय परिक्षेत यश संपादन केले इयत्ता १ ली तील बेंगारे मृणाल तुषार, कर्चे विराज हनुमंत हे राज्यात ५ वे तर अदिती अंबादास खटके या विद्यार्थीनीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.

बंडगर स्वप्नपरी रामचंद्र व तेंगिल श्रेयश ज्ञानेश्वर ह्यांनी A श्रेणी प्राप्त केला. B+ मध्ये मुंडे श्रेयस जयदीप,घोरपडे स्वराज किशोर, B श्रेणी मध्ये सपकळ अधिराज स्वप्नील, मोरे क्षितिज प्रकाश या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. ह्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा वागळे व वृषाली ननावरे ह्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

विद्यार्थ्यांच्या ह्या यशाबदल त्यांचे ,शिक्षकांचे व पालकांचे कौतुक शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सागर मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, विश्वस्त पल्लवी सांगळे, सी ई ओ. संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, बस विभाग प्रमुख दीपक बिबे सर, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे, राधा नाळे, निलिमा देवकाते, निलम जगताप यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!