स्थानिक

मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- वैभव नावडकर

मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- वैभव नावडकर

मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

बारामती वार्तापत्र

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक मूळ पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती बारामती विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले.
मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.

*मतदान केंद्रात मोबाईलला बंदी*
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.
मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नावडकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!