स्थानिक

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात बानप ठेकेदाराच्या वाहनाने केला अपघात, पिता-पुत्री यातुन बचावले

कचरा संकलन करणाऱ्या वाहन व त्यावरील मद्यधुंद चालकाच्या निष्काळजीपणा

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात बानप ठेकेदाराच्या वाहनाने केला अपघात, पिता-पुत्री यातुन बचावले

कचरा संकलन करणाऱ्या वाहन व त्यावरील मद्यधुंद चालकाच्या निष्काळजीपणा

बारामती वार्तापत्र

मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या पालकाच्या दुचाकीला धडक देणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनावरील चालकावर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र एनडीके कंपनीच्या संचालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता बारामती नगरपरिषद प्रशासन वारंवार अपघातास कारणीभूत ठरलेल्या एनडीके कंपनीबाबत काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास तीन हत्ती चौकाकडून बालविकास मंदीर शाळेकडे मुलीला घेऊन निघालेले योगेश नाळे यांच्या दुचाकीला नगरपालिकेच्या घंटागाडीने फरफटत नेले. सुदैवाने त्यांची दुचाकी या गाडीखाली आली नाही, अन्यथा अनर्थ झाला असता.

त्या नंतर योगेश नाळे यांनी पाठलाग करुन ही गाडी थांबवली. त्या नंतर या घंटागाडी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याधिका-यांना

यांना संपर्क साधला. मात्र ते घटनास्थळी आलेच नाहीत असाही आरोप योगेश नाळे यांनी केला होता. त्यानंतर योगेश नाळे यांनी या प्रकाराबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एनडीके कंपनीचा चालक विकास सुनील ससाणे (वय ३१, रा. जळोची, मूळ रा. घुगल वडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), वाहन कायदा १८१, १८४,१८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मागील महिन्याभरात एनडीके कंपनीच्या वाहनाकडून दूसरा अपघात घडला आहे. मात्र अद्याप संबंधित कंपनीच्या संचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या कंपनीबाबत अनेक तक्रारी असतानाही बारामती नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे हे याबाबत ठोस पावले उचलतील का असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!