मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

परळी (बीड) – प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे. जामीन करुनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

22 ऑक्टोंबर 2008 रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवुन दगडफेक करून बसचे समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी त्यास राज श्रीकांत ठाकरे यांनी चिथावणी दिली मजकुरावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं 208/2008अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 भा. दं. वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण जुने असुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम.मोरे पावडे यांनी दिला आहे.

यापुर्वीही झाले होते अटक वॉरंट जारी –

न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात याच प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. राज ठाकरे हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram