मनुष्यबळ विकास अकादमी चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार बारामतीच्या सचिन चव्हाण यांना जाहीर
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे विद्या प्रतिष्ठान च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मनुष्यबळ विकास अकादमी चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार बारामतीच्या सचिन चव्हाण यांना जाहीर
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे विद्या प्रतिष्ठान च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बारामती वार्तापत्र
मुंबईतील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2021, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील सहशिक्षक श्री सचिन भगवान चव्हाण यांना जाहीर झाला आहे. या अकादमीतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो.
सचिन चव्हाण हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गावर शिक्षक आहेत. त्यांनी लॉकडाउन मध्ये शाळा बंद असताना यूट्यूब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजेल असे व विद्यार्थ्यांचे मन लागेल असे आकर्षक यूट्यूब व्हिडिओ बनवले आहेत. गुगल फॉर्म चा वापर करून वेगवेगळ्या विषयाच्या स्वाध्याय चाचण्या बनवून त्याची लिंक विद्यार्थ्यांना देण्यात आली. आधुनिकतेचा वापर करून त्यांनी शाळेत शाळा बंद शिक्षण चालू असा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी घरी बसूनच शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला.
सचिन चव्हाण यांना या अगोदर बारामती पंचायत समिती च्या वतीने देण्यात येणारा ऑनलाईन व्हिडिओ मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यस्तरीय नवउपक्रम स्पर्धा मध्येहि त्यांनी भाग घेऊन प्रमाणपत्र मिळाले आहे.
शाळेत त्यांची एका वर्षासाठी नियुक्ती केली होती मात्र त्यांचे शिक्षणातील भरीव कार्य पाहता त्यांना यापुढेही सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे विद्या प्रतिष्ठान च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सचिन चव्हाण हे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेतही भाग घेणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा 30 तारखेला पुण्यात होणार आहे.
सचिन चव्हाण यांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रामचंद्र शिंदे व इतर पदाधिकारी ,सहकारी शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.