बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार.
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोनदा अत्याचार.

बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार.
बारामती- बारामती शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आकाश शिंदे( रा, यवत. ता. दौंड ) याच्या विरोधात शहर पोलिसांनी अपहरण बलात्कारसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बारामती शहरातील अल्पवयीन पीडितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बारामती शहरातील निराडावा कालव्या लगत असणाऱ्या इरिकेशन वसाहतीत २० मे व ६ जून रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी आकाश शिंदे व फिर्यादीची यवत येथील रेल्वे स्थानकात ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री होऊन आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातूनच २० मे व ६ जून रोजी रात्री १ ते ३ या वेळेत आरोपीने महत्त्वाचे काही सांगायचे आहे. पीडितेला दुचाकीवरून इरिकेशन वसाहतीत नेले व तेथे तिच्या इच्छेविरुद्ध फिर्यादी शरीर संबंध केले. शिवाय याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे करीत आहे.