मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजेंना सणसणीत टोला
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भाषा करणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांना शरद पवारांनी जोरदार टोला हाणला आहे.

पंढरपूर: बारामती वार्तापत्र
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सणसणीत टोला हाणला. ‘दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा,’ असं खोचक सल्ला पवारांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षण, संजय राऊत-देवेंद्र फडणीवस भेट व सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील प्रश्नांना उत्तरं दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करा अशी भूमिका उदयनराजे यांनी अलीकडंच मांडली होती. तर, सरकार दखल घेत नसेल लढावंच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. याबाबत विचारलं असता पवारांनी दोन्ही राजेंना सुनावले. ‘उदयनराजे व संभाजीराजे या दोघांनाही भाजपनं राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळं ते भाजपचीच भाषा बोलणार,’ असं सूचक वक्तव्य पवारांनी केलं.