मराठा सहकार्य समूहातर्फे बारामतीत सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
"ऐकमेकांना मदत करा व प्रशासनास सहकार्य करा"

मराठा सहकार्य समूहातर्फे बारामतीत सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
“ऐकमेकांना मदत करा व प्रशासनास सहकार्य करा”
बारामती वार्तापत्र
कोविड च्या दुसऱ्या लाटेचा बारामती मध्ये शिरकाव झाला आणि कोरोना अटोक्यात आणण्यासाठि सर्व स्थरावर प्रयत्न सुरु झाले. प्रशासना पासुन ते सर्व मेडिकल क्षेत्रातील लोक यात अहोरात्र काम करत असताना बारामती मधिल “मराठा सहकार्य समुह” यातील कार्यकर्ते बारामती पंचक्रोशितील पेशंट किंवा त्यांचे नातलग यांना बेड उपलब्धतेची माहिति पुरवने, प्लास्मा उपलब्ध करुन देने,रक्तदान शिबिरे आयोजित करुन रुग्नांना आवश्यक रक्त ऊपलब्ध करुन देने तसेच आवश्यक औषधे पुरवणे,जेवनाची सोय करुन देने अशी अनेक लोकहितोपयोगी कामे विना मोबदला अतिशय शिस्तबध्द पध्दतीने करताना दिसुन येत आहेत अशा सामाजिक बांधिलकि जपनार्या लोकांमुळे नक्किच प्रशासनावरिल ताण कमी होन्यास मदत होताना दिसत आहे. मराठा सहकार्य समुहातील सर्व सभासदांनी “ऐकमेकांना मदत करा व प्रशासनास सहकार्य करा” असे आवाहनहि सर्वांना केले आहे.