मराठी आणि हिंदी सिने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन
एक फेसबूक पोस्ट शेअर करून खोपकर यानी त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे.
मराठी आणि हिंदी सिने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन
एक फेसबूक पोस्ट शेअर करून खोपकर यानी त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे.
मुंबई – प्रतिनिधी
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज निधन झाले.त्यांच्या निधनाने कला जगतातील आणखी एक तारा निखळला. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.
पिंजरातील भूमिका आजरामर –
हिंदी आणि मराठी सिनेमा चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. वत्सला देशमुख यांनी पिंजरा चित्रपटात केलेली अक्काची भूमिका अजरामर झाली. या भूमिकेतील वत्सला यांच्या तोंडी असलेले संवाद सिनेरसिकांच्या मनावर आजही ठसलेले आहेत. या चित्रपटात त्या आपल्या छोट्या भगिनी दिवंगत अभिनेत्री संध्या यांच्यासोबत काम करत होत्या. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने अमेय खोपकर यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. ‘वत्सला देशमुख यांच्यासारख्या हरहुन्नरी अभिनेत्रींच्या जाण्याने चित्रपटक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. एक फेसबूक पोस्ट शेअर करून खोपकर यानी त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे.
वत्सला देशमुख यांनी सुरुवातीला ललितकलादर्श कंपनीच्या नाटकात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. या दरम्यान त्यांनी काही गुजराती नाटकात देखील काम केले. ‘बेबंदशाही’, ‘रणदुदुंभी’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘राक्षसी ‘महत्त्वाकांक्षा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘त्राटिका’ यांसारख्या नाटकांत देखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. दरम्यान, ‘शिर्डी के साईबाबा’ या हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांत त्यांनी काम केले. हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर त्यांना ‘तुफान और दिया’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’, ‘लडकी सह्याद्री की’, ‘हिरा और पत्थर’ या हिंदी सिनेमात देखील काम केले.