क्राईम रिपोर्ट

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी बारामतीत गुन्हा दाखल

पती संकल्प हे दारु पिवून येत तिच्यावर संशय घेवू लागले

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी बारामतीत गुन्हा दाखल

पती संकल्प हे दारु पिवून येत तिच्यावर संशय घेवू लागले

बारामती वार्तापत्र

मला आमदार झाल्यासारखं वाटतय या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे (रा. अद्विका रेसिडेन्सी, पुनावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे ) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी त्यांची पत्नी मिनल संकल्प गोळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली. त्यानुसार पती संकल्प गोळे, सासू शोभा अजाबराव गोळे, सासरे अजाबराव मारुती गोळे, नणंद समिक्षा अजाबराव गोळे, दिक्षिता स्वप्निल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ५ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली. मिनल व संकल्प यांचा विवाह काळज (ता. फलटण, जि. सातारा) येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. लग्नानंतर एक महिना संसार व्यवस्थित सुरु होता. परंतु त्यानंतर पती संकल्प हे दारु पिवून येत तिच्यावर संशय घेवू लागले. तु काम व्यवस्थित करत नाही, तु कोणाबरोबरही चॅटींग करते, बोलते. तुला घरकाम येत नाही. तु तुझे बारामतीतील मेडिकल शाॅप बंद करून पुणे येथे सुरु कर अन्यथा तुला नांदवणार नाही, असे ते म्हणत. शिवाय तुला नांदवायचे नाही, तू मला घटस्फोट दे, असे म्हणत तिला हाताने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली जात होती.

सासू शोभा यांनी ‘तू मला उलट बोलतेस, तुला नांदवायचे नाही’ असे म्हटले. तर ‘समिक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरहून आण’ अशी मागणी सासूने केली. सासरे यांनीही मेडिकल शाॅप पुण्यात सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण असे म्हणत उपाशीपोटी ठेवून शारिरिक व मानसिक छळ केला. नणंद समिक्षा व दिक्षिता यांनीही सतत शिविगाळ, दमदाटी केली. लग्नावेळी घातलेले दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेत तिला फेब्रुवारी २०२४ मध्ये राहत्या घरातून हाकलून दिले. त्यामुळे फिर्य़ादीने बारामतीत बहिणीच्या घरी आसरा घेतल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!