मला कधीही हाक द्या.तुमच्या मदतीला धावून येईल….युवा नेते श्रीराज भरणे
गावात चालु असलेल्या विकासकांमांबाबत समाधान व्यक्त केले.

मला कधीही हाक द्या.तुमच्या मदतीला धावून येईल….युवा नेते श्रीराज भरणे
गावात चालु असलेल्या विकासकांमांबाबत समाधान व्यक्त केले.
निमगाव केतकी प्रतिनिधी; बारामती वार्तापत्र
निमगाव केतकी येथील कान्होबा मळा व काळामळा या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ युवा नेते श्रीराज भरणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मृद व जलसंधारण विभाग यांच्या मार्फत कान्होबा मळा येथील २० लाख ९४ हजार रुपयांचा बंधारा तसेच जि.प. शाळा काळामळा येथे क्रीडा साहित्यासाठी तीन लक्ष रु चे साहित्य प्रदान करण्यात आले राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महादेव मंदिर ते बारवकर वस्ती माने वस्ती रस्त्याची 25 वर्षाची मागणीकरून 25 लाख रुपये लाख निधी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल अमोल राऊत व ग्रामस्थांच्या वतीने मामांचे आभार मानण्यात आले
दरम्यान श्रीराज भरणे यांनी गावातील ओढा खोलीकरणाच्या कामाला भेट दिली व कामाची माहीती घेतली. गावात चालु असलेल्या विकासकांमांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मला केव्हांही हाक द्या. मी तुमच्या मदतीला धावून येईल आसे आश्वासन श्रीराज भरणे यांनी दिले.
यावेळी निमगाव केतकी चे सरपंच प्रविणभैया डोंगरे यांनी श्रीराज भरणे यांचे स्वागत केले.व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमच्यावर विश्वास टाकून निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल आभार मानले. दत्तात्रय भरणे यांच्या विचारां वर आम्ही समाजकारण व राजकारण करत आहोत. आधी काम करतो आणि मग सांगतो. ह्याच तत्वावर माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन निमगाव गावाचा विकास करायचा आहे,असे सरपंच प्रविण डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापूरे ,रामचंद्र हेगडे,तंटामुक्ती अध्यक्ष अतुल मिसाळ, क्रिडा अधिकारी महेश चावले,अजित मिसाळ,अमोल राऊत,संतोष जगताप,दिपक भोंग,ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संजय राऊत, सागर मिसाळ, रवी शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.