‘मविआ’ला पुन्हा धक्का,मलिक देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली
लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2022/06/malik-deshmukh-780x470.jpg)
‘मविआ’ला पुन्हा धक्का,मलिक देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली
लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही.
मुंबई,प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला सरकारला मोठा धक्का दिलाय. मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावं, कारण दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत देखील देशमुख मलिकांना मतदान करता येणार नाही.
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाला विरोध केला होता. कुठल्याही ‘कैद्याला मतदान करू देण्यास सोडणे गैर’असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कैदेत असता तेव्हा तुमच्यावर निर्बंध असतात. तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांसारखे अधिकार राहत नाहीत, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळत त्यांना परवानगी नाकारलीय.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देत आशिष शेलार म्हणाले की महाविकासआघाडीची नकारघंटा वाजण्यास सुरूवात झाली आहे. आता भाजपाची शुभ वेळ सुरू झाली आहे. ही भाजपाच्या विजयाची सुरूवात झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे..