इंदापूर

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तहसील कचेरीवर आंदोलन

केंद शासनाचा केला निषेध व्यक्त

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तहसील कचेरीवर आंदोलन

केंद शासनाचा केला निषेध व्यक्त

इंदापूर : बारामती वार्तापत्र 

पेट्रोल,गॅस,खाद्यतेल व वाढत्या महागाईच्या विरोधात व केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.२) रोजी इंदापूर तहसील कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यलयापासून तहसील कचेरी पर्यंत वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू मंहगा तेल,मोदी सरकारचा निषेध असो,चोर है चोर है मोदी सरकार चोर है अशा विविध घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेला खोटी आश्वासने देत व भूलथापा मारून सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आज देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली असून पेट्रोल-डिझेल तसेच गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांचे जीवन मुश्किल केलेले आहे,गोरगरीब जनतेशी असंवेदनशील असणाऱ्या केंद्र सरकारचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहोत तसेच मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसवर आवाच्या सव्वा कर लावून प्रचंड दरवाढ केलेली आहे, सोबतच खाद्यतेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवून गोरगरीब जनतेच्या हातातील घास ओढण्याचे पाप केलेले आहे.त्यामुळे अशा लबाड मगरूर असणार्‍या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करत आहोत तसेच मोदी सरकारने ही दरवाढ लवकरात लवकर कमी करावी अन्यथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यांमध्ये सर्वत्र निषेध मोर्चा व आंदोलने करणार आहोत अशा आशयाचे निवेदन यावेळी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले

यावेळी इंदापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, दिलीप वाघमारे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन देवकर, संजय देवकर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुभाष डरंगे, वसंत आरडे, विजू पाटील धनाजी देवकाते,वसीम बागवान प्रकाश निकम,शिवाजी पांढरे, लक्ष्मण देवकाते, शिवाजी जगताप, नवनाथ रुपनवर, तानाजी पिंगळे, शिवाजी तरंगे, नंदकुमार कांबळे सह अन्य कार्येकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!