महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील दुग्ध व्यवसायाची यशोगाथा
1990 पासुन त्यांच्याकडे वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील दुग्ध व्यवसायाची यशोगाथा
1990 पासुन त्यांच्याकडे वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय आहे.
बारामती वार्तापत्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,संलग्नित ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय बारामती , ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सन 2021-2011 या अंतर्गत बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे ,येथील कृषीदुत अशितोष दादासो मोरे याने बारामती मधील सोनवडी सुपे येथील दुग्धव्यवसाय वावगे राजेंद्र बाबासो यांच्या दुग्ध व्यवसायाची माहिती घेतली असता ,मुखघास, हिरवा चारा, या चाऱ्याचे काटेकोर नियोजन, मिल्किंग मशिनने काढणी, आरोग्य,पाणी यांचे नेटके व्यवस्थापन मुक्त गोठा पद्धत,आदी सोनवडी सुपे ( ता.बारामती ) येथील राजेंद्र वावगे कुटुंबाच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. एकत्रित कुटुंब असलेल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे कामाची जबाबदारी दिल्याने व्यवसायात सुसूत्रता आली आहे.
बारामती तालुक्यापासुन सुमारे 18 किमी वरती सोनवडी सुपे हे गाव दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन या व्यवसायासाठी ओळखले जाते. गावातील कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम या व्यवसायाने केले आहे. गावात दररोज सुमारे 6-8 हजार लीटर दुध संकलन होते. वावगे कुटुंब यांच्याकडे सुमारे 1990 पासुन त्यांच्याकडे वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय आहे. कुटुंबाने टप्याटप्याने सुधारणा करत दुग्ध व्यवसाय आधुनिक व फायदेशीर केला आहे.10 एकर शेती असणाऱ्या या वावगे परिवाराने लिंबु,ऊस व भाजीपाला या उत्पादनातही आपली ओळख निर्माण केली. सात सदस्यीय कुटुंबातील पाच सदस्यांकडे दुग्ध व्यवसायाची मुख्य जबाबदारी आहे.
वावगे यांच्याकडे सद्य स्थितीत 20-25 टन मुरघास उपलब्ध आहे. तो सुमारे तीन महिने पुरेल, चविष्ट रुचकर असल्यामुळे जनावरे तो आवडीने खातात चाऱ्यात गुळ, मीठ, युरिया, मिनरल मिक्चर ,तसेच प्रथिने आदी घटक मिसळले तर चारा अधिक चवदार होत असल्याचा वावगे यांचा अनुभव आहे. वर्षाला सुमारे 10ते12 गायी दुधाळ असतात.
प्रती गाय दररोज दोन्ही वेळ सरासरी 15 लीटर दुध देते. गावातील डेअरीला 22-23 रुपये प्रती/ लीटर दराने दुध घातले जाते. प्रति गायी पासुन प्रती दिन 330 रुपये मिळतात. त्यातील चारा किंवा आहार औषधोपचार असा मिळून सुमारे दिडशे रुपये खर्च असतो. महिन्याला सुमारे तीन ते पाच ट्रॉली पर्यंत शेणखत मिळते. पिकांचे अवशेष पाचट यांचाही समावेश शेणखतात होतो. त्यांच्या गोठ्यात 15 दुधाळ गायी व लहान 5 वासरे असे एकुण 20 गायींमागे वीस कोंबंड्या सोडतात. त्यामुळे गोचिड अळी माश्यांची अंडी त्यातुन साफ होतात व कोंबडी अंड्यातुनही उत्पन्न मिळते.
राजेंद्र वावगे हे नोकरीच्या मागे न लागता त्यांनी एक छोटीशी आधुनिक व सुरेख सुरुवात केली. त्यांनी मुलाखतीत तरुणाईला सांगितले की नोकरीच्या मागे लागेपर्यंत स्वःत नोकऱ्या निर्माण करा आणि शेतीकडे संधी म्हणून पहा.