महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी – राकेश कांबळे
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना दिले लेखी निवेदन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी – राकेश कांबळे
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना दिले लेखी निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्फत महायुती सरकार काळात मंजूर करण्यात आलेली कर्ज प्रकरणे निकाली काढण्याची मागणी आरपीआयचे इंदापूर तालुका सरचिटणीस राकेश कांबळे यांनी केली असून याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लेखी निवेदन दिले आहे.
महायुती सरकार काळात सुशिक्षित बेरोजगारांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची प्रकरणे मंजूर करण्यात आली होती.परंतु महाविकास आघाडी सरकारने सदरील प्रकरणे निकाली न काढता निधी थांबवून ठेवला.त्यामुळे ४ लाख व ५ लाख निधींची प्रकरणे निधीची पूर्तता करून निकाली काढावीत असे आदेश करावेत आणि समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नामदार आठवलेंकडे करण्यात आली आहे.