टी.सी. महाविद्यालयात आरोग्य जागृती कार्यशाळा संपन्न
या उद्देशाने यावेळी इतर तपासण्यांबरोबरच थायरॉईड तपासणी देखील केली गेली.

टी.सी. महाविद्यालयात आरोग्य जागृती कार्यशाळा संपन्न
या उद्देशाने यावेळी इतर तपासण्यांबरोबरच थायरॉईड तपासणी देखील केली गेली.
बारामती वार्तापत्र
भारतभर साज-या होत असणा-या आजादी का अमृत महोत्सवानिमित्त टी.सी महाविद्यालयातील, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, निरामय मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर बारामती आणि राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य
जागृती कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर,डॉ.प्रा.रंजना नेमाडे व डॉ.अशोक देशपांडे यांच्या हस्ते झाले.
डॉ.अशोक देशपांडे यांचे निरामय मेडिकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त सामंजस्य करारांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून विविध आरोग्य शिबीरे आयोजित केली जातात.
नववर्षाचे निमित्त साधून महिलांमधील थायरॉईडचे वाढते प्रमाण पाहता थायरॉईडचे योग्यवेळी निदान व्हावे व वेळीच उपचार घेतले जावेत या उद्देशाने यावेळी इतर तपासण्यांबरोबरच थायरॉईड तपासणी देखील केली गेली. या कार्यशाळेत संस्था व महाविद्यालयातील
प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, सेविका यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली.
यासाठी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीने विशेष परिश्रम घेतले. उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. थायरॉईड,मधुमेह नियंत्रण, हिमोग्लोबीन वाढ यासाठी समतोल आहार व व्यायाम याविषयी जागृती करण्यात आली.
सदर कार्यशाळेसाठी निरामय मेडिकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च चे अध्यक्ष डॉ.अशोक देशपांडे आणि त्यांच्या सहका-यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.जवाहर शहा व संस्थेचे सचिव श्री.मिलिंद शहा यांचे विशेष योगदान होते.
सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुनिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर,
रुसा समन्वयक अजित तेळवे, सर्व उपप्राचार्य,रजिस्ट्रार यांचे कार्यशाळेसाठी मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेत महाविद्यालय परिवारातील 103 महिला आणि 84 पुरुषांनी यात सहभाग घेतला.