महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांची आढावा बैठक संपन्न
शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांची आढावा बैठक संपन्न
शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा
बारामती वार्तापत्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांची आढावा बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली.
यावेळी निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव , नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार पी.डी.शिंदे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहन पवार, तांत्रिक अधिकारी सुरज पवार, विजय निंबाळकर व अमोल सोनवणे,नवनाथ जाधव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये तहसिलदार पाटील यांनी तहसिल कार्यालय, बारामती व पंचायत समिती, बारामती यांचे मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम उद्योग, वैयक्तिक वृक्ष लागवड, रोपवाटिका, फळबाग लागवड, रस्ते, ओढा खोलीकरण,घरकुल, सिंचन विहीर, गाय गोठा, कुकुट पालन शेड, शेळीपालन शेड, वैयक्तिक शोष खड्डा इत्यादी कामांचा आढावा घेतला. तसेच रेशीम उद्योग हा एक शेतीपूरक उद्योग आहे. शासनाकडून या उद्योगाकरीता चांगल्या सवलती देण्यात आल्या असल्याने जास्तीत जास्त
शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी केले.