महामानवांच्या यादीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव न टाकल्याच्या निषेधार्त बारामतीत मातंग समाजाच्या वतीने निषेध
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत समाविष्ट करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा.
महामानवांच्या यादीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव न टाकल्याच्या निषेधार्त बारामतीत मातंग समाजाच्या वतीने निषेध
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत समाविष्ट करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा.
बारामती वार्तापत्र
देशातील समाजसुधारक व महामानवांच्या यादीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव न टाकल्याच्या निषेधार्त आज (दि:६) रोजी बारामती भिगवन चौक येथे बारामती शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
शोषित, वंचित घरकांचा आवाज शब्दातून मांडणारे ३५ कादंब-या, १४ लोकनाटय, १० पोवाडे, १३
कथासंग्रह, ७ चित्रपटकथा, १ प्रवासवर्णन लिहून जे साहित्यक झाले. सयुक्त महाराष्ट्राचे
शिल्पकार आण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे
संचालक विकास त्रिवेदी यांनी आण्णाभाऊ साठे यांचे बद्दल अवमान कारक भाषा
वापरून, आण्णाभाऊ साठे साधारण माणुस आहे. म्हणून महापुरुषांच्या यादीतून जातीय
द्वेषभावनेतून नांव वगळणा-या विकास त्रिवेदी यांना तत्काळ निलंबत करावे तसेच राज्य सरकारने आण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा अहवाल केंद्राकडे उशीरा पाठविल्याने राज्य सरकारचा जाहिर निषेध देखील करण्यात आला.
देशातील समाजसुधारक आणि महामानवांच्या यादीत अण्णाभाऊ साठेचे नाव नसल्याचे निदर्शनास येताच या प्रकारचा तीव्र शब्दात बारामतीसह राज्यात मातंग समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे
केंद्रात भाजपचे शासन आहे. भाजपच्या लोकांना, नेत्यांना देशाचा खरा इतिहास माहीत नाही.खोटा इतिहास सांगून लोकांना हे लोक भ्रमित करत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत समाविष्ट करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अपमान झाल्यास संपूर्ण भारतभर आंदोलन केले जाईल असा इशारा देखील बारामती शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला.