महाराष्ट्रभूषण स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ यशस्वी केली.

महाराष्ट्रभूषण स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ यशस्वी केली.
मुंबई, दि.१ :- बारामती वार्तापत्र रिपोर्ट
थोर समाजसुधारक, महाराष्ट्रभूषण, स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-परंपरा, जातीव्यवस्था, स्त्रियांवरील अत्याचारांसारख्या कुप्रथांविरुद्ध समाजप्रबोधन केले. स्त्रीयांना समाजात मानाचे स्थान, आत्मसन्मान मिळवून दिला. प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ यशस्वी केली. स्वर्गीय नानासाहेबांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात सुरु केलेलं कार्य पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रभूषण स्वर्गीय नानासाहेबांच्या जयंतिनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.