महाराष्ट्र

“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?”

"सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम"

“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?”

“सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम”

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही ते म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. “महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?,” अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली आहे.

“एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.

आणखी वाचा- सुशांत प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांचं जाहीर आव्हान, म्हणाले…

“बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी केली. ते आता बिहारमधून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या प्रचाराला जाणार का?,” असा प्रश्न अनिल देशमुख यांनी यावेळी विचारला.

YouTube player

अनिल देशमुख यांनी यावेळी सुशांत मृत्यू प्रकरणावर अमेरिकेतील विद्यापीठाने तयार केलेला रिपोर्टचा दाखला दिला. “रिपोर्टमध्ये सुशांत प्रकरण एका राजकीय पक्षाने वेगळ्या दिशेने नेलं असून, प्रसारमाध्यमांकडून मोठं करण्यात आलं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. “एका पक्षाने सुपारी घेतली होती,” असा आरोप यावेळी त्यांनी नाव न घेता केला. “महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची मजल गेली होती,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

आणखी वाचा- सुशांत सिंह आत्महत्या : मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्

“ज्यांनी पाच वर्ष मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हटलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र करोनाविरोधात युद्ध लढत असताना महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आलं. महाराष्ट्राला बदनाम करण्यात आलं. त्याच्याही पुढे जाऊन जे बाहेरचे आहेत पण महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत अशा बाहुलीलाही आपल्या तालावर नाचवण्याचं काम या पक्षाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यानिमित्ताने बदनाम झाला आहे,” अशी टीका अनिल देशमुखांनी केली.

पुढे ते म्हणाले की, “बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. आता ते राजकारणात गेले आहेत. बिहारमधून ते निवडणूक लढत असताना महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे ज्यांनी महाराष्ट्र, मुंबई पोलीस यांची बदनामी केली त्यांच्या प्रचाराला जाणार का?”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!