महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ !शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी IT च्या रडारवर; अजित पवारांच्या 3 बहिणींच्या कंपन्यांवरही छापे
आयटीकडून 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ !शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी IT च्या रडारवर; अजित पवारांच्या 3 बहिणींच्या कंपन्यांवरही छापे
आयटीकडून 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
मुंबई ;प्रतिनिधी
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस IT च्या रडारवर आहे. महाराष्ट्रात 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात 25 निवासस्थानं आणि कार्यालयं आहेत. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये आयकर अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बंगळुरूमध्येही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
आयकर विभागाने पहाटे 5 वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी मुंबईत 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवसैनिक संजय कदम यां समावेश आहे. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कदम हे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचं घर आहे.त्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली.
पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचं घर आहे. संजय कदम अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत